सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर करण्याच्या काही मिनिटांआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनसही जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तीन हजार रुपये अधिक आहे. बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस मिळणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २८,००० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला. खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर संघाने बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना ४०,००० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना एक्स-ग्रॅशिया बोनस देण्याची विनंती युनियनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती. गेल्या वर्षी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना २६,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. मात्र यावेळी गेल्या वर्षीपेक्षा अधिक बोनस कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 15-10-2024