jayant patil : निवडणूक एका टप्प्यात, महायुतीचा कार्यक्रमही एकाच टप्प्यात : जयंत पाटील

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम’ अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदानही महायुतीचा एकाच टप्प्यात पराभव करण्यासाठी तयार झाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी आहे, पण आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू, महाविकास आघाडीमध्ये 210 ते 218 जागांवर एकमत झालं असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित 60 जागांवरही एकमत होईल.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीवरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. 12 पैकी 7 जणांना आमदारकी दिली. आता उर्वरित 5 जागांचं आमिष इतर सगळ्यांना दाखवलं जाईल असा टोला जयंत पाटलांनी महायुतीला लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:09 PM 15/Oct/2024