राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात : रामदास कदम

मुंबई : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफी जाहीर करून राज्य सरकारने जनहिताचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करताना शिवसेना (शिंदे) गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, की महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले, पण या सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असून त्यांच्या सरकारने अडीच वर्षांत २५० हून अधिक निर्णय घेतले असल्याचं कदम यांनी नमूद केलं.

याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमाफीच्या निर्णयाला उशिराचं शहाणपण म्हणून टिप्पणी केली होती, ज्यावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं. कदम म्हणाले, की राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यात आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिसतात. निवडणुका आल्या की प्रत्येक निर्णयावर टीका करायची गरज नसते. त्यांनी चांगल्या निर्णयाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे.या निर्णयामुळे सरकारने मनसेला आपल्या बाजूला वळवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातं. महायुतीला मनसेसोबत युती करायची इच्छा असली तरी मनसेने याबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:29 15-10-2024