रत्नागिरी : विकसित महाराष्ट्र २०४७ च्या नागरिक सर्वेक्षणात सहभागाचे आवाहन

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अनुषंगाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दि.६ मे ते २ ऑक्टोबर, २०२५ अशा १५० दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली असून, त्याला अनुसरून विकसित महाराष्ट्र २०४७ चे नागरिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

विकसित महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करा.

राज्यातील नागरिकांच्या विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा प्राथम्यक्रम जाणून घेण्यासाठी नियोजन विभागामार्फत माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यस्तरीय सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण 18 जून 2025 पासून सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होईल. जिल्हास्तरीय सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांचा सहभाग घेण्यात येत आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत-भारत @ 2047 (India @2047) करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांनासुद्धा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 05-07-2025