मुंबई : मुंबईच्या अंधेरीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अंधेरीच्या पश्चिमेत लोखंडवाला परिसरात असलेल्या रिया पॅलेस या इमारतीला लागली मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार आज,16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास रिया पॅलेस इमारतीच्या दहावा मजल्यावर एका घरामध्ये ही मोठी आग लागली. क्षणात या आगीने रौद्ररूप धरण केलं. परिणामी या आगीमध्ये घरात असलेले दोन वयस्कर नागरिक आणि एक नोकरचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एका घरात तिघांचा होरपळून मृत्यू
आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 5 गाडा घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत.
चंद्रकांत सोनी (वय 76 वर्ष) कांता सोनी (वय 71 वर्ष) आणि नोकर रवी (वय 33 वर्ष) असे या घटनेत तिघांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 5 गाडा घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत. सध्या फायर कूलिंग चे काम अग्निशमन दलाचा जवानांकडून सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र पहाटे लागलेल्या या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 16-10-2024














