विषारी औषध प्राशन केलेल्या रत्नागिरीतील व्यक्तीचा कोल्हापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी ग्रामीण, गुरुवार, १० जुलै २०२५: विषारी औषध प्राशन केल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या संजय श्रीकांत बोंबले (वय ४५, रा. हातखंबा, ता.जि. रत्नागिरी) यांचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २६ जून २०२५ रोजी घडली असून, याबाबतची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ जुलै २०२५ रोजी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय बोंबले यांनी आपल्या राहत्या घरात ‘ग्रामोझोन’ नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले.

कोल्हापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५४/२०२५ अन्वये, भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेमुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 10/Jul/2025