पालघर : डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचा (Earthquake) धक्का बसल्याने पुन्हा एकदा दोन्ही तालुक्यातील गावे हादरली आहेत. तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना मंगळवारी दुपारी 4 वाजून 47 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.
त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल, डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील 2018 पासून पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंप थांबले होते. मात्र मंगळवारी दुपारी 4 वाजून 47 मिनिटे 29 सेकंदाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केल व त्यांची नोंद 3.5 अशी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भूकंप थांबले होते. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा तलासरी आणि डहाणू तालुक्यातील गावे हादरली आहेत. दुपारी भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.
भूकंपाच्या केंद्रबिंदूत वारंवार बदल होत असून मंगळवारी दुपारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले असून पाच किलोमिटर खोल जमिनीत भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजून 47 मिनिटाला 3.5 रिश्टर स्केल नोंद झालेल्या भूकंपाचा धक्का डहाणू, तलासरी आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तसेच दादरा नगर हवेली येथील सेलवासा, खानवेळपर्यंत बसला आहे. त्यामध्ये, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डहाणू, तलासरी परिसरातील गावांना पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात भूकंपाने जमीन हादरल्याने नागरिकांना भूकंपाची भीती वाटत असूनही घराबाहेरही झोपता येत नाही. त्यामुळे, येथील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली दिवस काढावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 16-10-2024