चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अंतिम टप्प्यातील भातलावणी रखडली आहे. तालुक्यात सरासरी ९० टक्के भात लागवड झाली. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने गावोगावी पंपाने पाणी घेऊन भातलावणी करण्यावर शेतकऱ्यांना जोर दिला आहे. आतापर्यंत तालुक्यात ५ हजार ३३१ हेक्टरवर भातलावणी झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यात जवळपास भातलावणीसाठी १० हजार हेक्टर तर नाचणी लागवडीसाठी १ हजार हेक्टर क्षेत्र पूरक आहे; मात्र गेल्या काही वर्षात भात लागवडीचे प्रमाण कमी होत चालले आहे. पशुधनांची संख्या कमी झाली, त्याच्या जोडीला गावागावातील शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने शेतीदेखील ओस पडू लागली आहे. यावर्षी मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी रखडली होती. पुढे पावसाला चांगली सुरुवात झाल्यानंतर भातलावणीचा जोर वाढला. गेले २०-२५ दिवस सातत्याने भातलावणीत गावोगावचे शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. पाणी उपलब्ध असणाऱ्या सखल भागातील भातलावणी पूर्णत्वास गेली. परंतु जेथे पाण्याची सुविधा नाही त्यांना मोठ्या पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या तीन-चार दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत भातलावणीची रोपेही तयार आहेत त्यामुळे आहे त्या स्थितीत लावगी केली जात आहे.
तालुक्यात १० हजार हेक्टर भात लागवडीयोग्य असले तरी गतवर्षी ६२०० हेक्टरवर भाताची लागवड झाली. अलीकडच्या काही वर्षात सरासरी ६५०० हजार हेक्टरवर भात लागवड होणे सध्या तालुक्यात १० जुलैअखेर ५३३१ हेक्टर भीताची लागवड झाली नाचणी लागवडीसाठी १२५ हेक्टरवर आहे नाचणी लागवडीसाठी हेक्टर पूरक क्षेत्र असले तरी भाताप्रमाणे नाचणीची लागवडदेखीत उपलब्ध दिसत आहे. उपलब्ध पाण्यावर येत्या दोन-चार दिवसांत भात लागवड पूर्णत्वास जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाचा जोर कमी झाल्याने भातलावणीचा मोठा प्रश्न पडता आहे. एकीकडे ट्रॅक्टरद्वारे चिखलणी, लोकांची जुळवाजुळव करून लावणी आणि पंपाच्या सह्याने दीड-दोन हजार मीटरवरून पाणी घेऊन कसरत करून लावणीचा उद्योग करतोय. लांबून पाणी घेतल्याने चिखलणीला तेवढे पुरेसे पाणी येत नाही. परंतु पावसाचा जोर नसल्याने आता आहे त्या स्थितीत लावणी करण्याशिवाय पर्याय नाही. साहाय्यक कृषी अधिकारी दादासाहेब खारतोड यांचे सांगते मार्गदर्शन मिळते. त्यांच्या सूचनेनुसार शेतीची कामे करत आहोत – विनायक शिंदे, प्रगतशील शेतकरी, शिरगाव,
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 11/Jul/2025













