रत्नागिरी : मुंबई अभियंता गट आणि केंद्र खडकी (पुणे) येथे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) अग्निवीर (तांत्रिक) आणि अग्निवीर (ट्रेड्समन १० वी आणि ८ वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुला श्रेणी) साठी युनिट मुख्यालय कोट्याअंतर्गत अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ही भरती मुख्यालय BEG आणि केंद्र, GS (क्रीडा फक्त) श्रेणीतील उमेदवारांसाठी ४ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रायोजित आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी Bombay Engr Gp & Center आणि www.bsakirkee.org या वेबसाइटवर संपर्क करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 12-07-2025













