मंडणगड : मंडणगड शहरात उभ्या रहात असलेल्या तालुक्याचे कनिष्ठ न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पाहणी केली व बांधकामाचा आढावा घेतला.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधक अदिती कदम, मंडणगड कनिष्ठ न्यायालयाच्या न्या. अमृता जोशी, मुंबई उच्च न्यायालयाचे उपनिबंधक ज्ञानेश्वर मोरे, बार कौन्सील महाराष्ट्र-गोवाचे अध्यक्ष अँड. संग्राम देसाई, बार असोसिएशन मंडणगडचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता एस. एन. राजभोज, अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ए. एम. रामसे, उपअभियंता मंडणगड एम. व्ही. वास्ते, स्थापत्य अभियंता सी. बी. एकरे, बांधकाम ठेकेदार संदीप पाटील, तहसीलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार आदी उपस्थित होते.
८ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायलायाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या मुख्य उपस्थितीत न्यायालयाचे इमारतीचे भूमिपूजन व तात्पुरत्या स्वरुपातील जागेत न्यायालयाचे नैमित्तिक कामकाजास सुरुवात करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाचे नव्या इमारतीचे निर्मितीचे कामाने गती घेतली आहे. या कामाची जिल्हा न्यायालयाचे माध्यमातून वेळोवेळी पाहणी करून कामातील प्रगतीचा आढावा संबंधीत यंत्रणेकडून घेतला जात आहे.
दरम्यान (१२) रोजी इमारतीचे कामकाजाची पाहणी केल्यावर न्यायालयाच्या इमारतीचे परिरसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीच्या निर्मितीच्या कामासही गती देण्याच्या सूचना संबंधीतांकडून बांधकाम विभागास देण्यात आल्या व नियोजित जागेची पाहणीही केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 14/Jul/2025













