रत्नागिरी : जिल्ह्यात १० जुलैपासून गुरुपौर्णिमेच्या औचित्याने जागतिक युवा कौशल्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी, १५ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिन होणार आहे.
यानिमित्ताने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कौशल्याद्वारे युवा सक्षमीकरण’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंगळवारी कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कौशल्याद्वारे युवा सक्षमीकरण या उपक्रमातंर्गत येथील अरिहंत मॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्याचा वापर करून उत्पादनांची निर्मिती आणि विक्री याबाबत मार्गदर्शन होणार आहे. तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. या उपक्रमातून नवमहिला उद्योजिकांना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व भगिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्रीमती शेख यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 14-07-2025














