चिपळूण : ढाकमोली येथील लोखंडी साकव दुरुस्तीसाठी मिळणार निधी

चिपळूण : तालुक्यातील ढाकमोली कोंडसुतारवाडी येथील लोखंडी साकवासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या साकवाचा विषय मार्गी लागणार आहे.

ढाकमोली कोंडसुतारवाडी येथील लोखंडी साकवाच्या खालील लोखंडी पट्ट्या सडून तुटल्या असून साकवावरून जाणे-येणे धोक्याचे झाले आहे. हा साकव तुटल्याने कोंडसुतारवाडी व धनगरवाडी यांचा संपर्क तुटेल कारण, या दोन वाड्यांना या साकवाशिवाय अन्य मार्ग नाही. त्यामुळे साकव दुरुस्त करून मिळावा, अशी मागणी ढाकमोळीच्या सरपंच मीनल लाड यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या वेळी शिवसेना माजी विभागप्रमुख रूपेश घाग, माजी सरपंच दादा लाड उपस्थित होते. या मागणीनुसार सामंत यांनी या सकवासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या साकवाचे काम लवकरच मार्गी लागेल, असे घाग यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 14/Jul/2025