खेड : शहरातील जगबुडी नदीजवळील गणेश विसर्जन घाटाच्या दुसऱ्या बाजूला नव्याने गणेश विसर्जन घाट उभारण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन घाटाच्या उभारणीचे काम सुरू असतानाही केवळ एक भिंतच उभारण्यात आली आहे. ही भिंतही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकली आहे.
घाटाचे कामही अपूर्णावस्थेत असल्याने यंदाही गणेशभक्तांना नव्या घाटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवा गणेश विसर्जन घाट उभारण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला; मात्र दोन वर्षांत उभारण्यात आलेली एक संरक्षक भिंत सद्यःस्थितीत कचऱ्याच्ऱ्या ढिगाऱ्यात अडकली आहे. नगरपालिकेने जगबुडी नदीकिनारी कचरा टाकण्यास मज्जाव केलेला असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे कचरा टाकला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 14/Jul/2025














