संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेत उतरणाऱ्या पायऱ्यांचे रखडलेले काम शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आले. काही दिवसांपासून हे काम थांबले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणच्या गटारे आणि पायऱ्यांचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.
नावडी गावचे सरपंच विवेक शेरे यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी चर्चा करून काम सुरू करण्यासाठी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांतून व्यापाऱ्यांनी सहकार्य दाखवत पुन्हा काम सुरू होण्यास मदत केली. पायऱ्या बांधताना मध्येच आलेल्या विजेच्या खांबाभोवती सुरक्षिततेसाठी पाइप घालून संरक्षक कवच देण्यात आले आहे. पुन्हा कामाला सुरुवात झाली. त्या वेळी सरपंच विवेक शेरे यांच्यासह व्यापारी बेंडके, शेट्ये, खातू, झगडे, लोध, सप्रे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 14/Jul/2025














