रत्नागिरी : आरजू टेक्सॉल कंपनीकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी मुख्य आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले आहे.
या फसवणुकीतील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी पकडले होते, परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी अनी जाधव अजूनही फरार आहे. त्याला जेरबंद करण्यात पोलिस प्रशासनाला १ ऑगस्टपर्यंत यश आले नाही, तर १२०० सदस्यांसह आमरण उपोषण करणार असल्याची माहिती रत्नागिरी मानवाधिकारचे जिल्हा संघटक विलास सुर्वे व वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी (दक्षिण) चे जिल्हा अध्यक्ष गौतम गमरे यांनी दिली. या कंपनीतील संशयितांनी प्रोडक्ट तयार करून द्या, उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करणाऱ्यांनी रोजगाराची संधी अशी जाहिरात पांपलेट छापून वाटली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 14/Jul/2025














