संगमेश्वर : तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी देवरुख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ६६ जागांवर महिलांसाठी आरक्षण सोडतीतून निश्चित करण्यात आले.
हा कार्यक्रम तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांसह महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच तालुक्यातील इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सोडत कार्यक्रमात चिठ्ठी काढण्यासाठी इशा विनायक गोरुले या शाळकरी मुलीने सहकार्य केले.
आरक्षण सोडत कार्यक्रमांमध्ये तालुक्यात अनुसूचित जमाती साठीच्या आरक्षण निरंक राहिले. कार्यक्रमात प्रथमच अनुसूचित जाती स्त्री साठीचे आरक्षण सोडण्यात आले
यामध्ये कोंड असुर्डे, उजगाव, आंबेड खुर्द व शिवधामापूर या ग्रामपंचायतींचे आरक्षण पडले. अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी काटवली, पाटगाव या ग्रामपंचायतींची सरपंच पदाची सोडत करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी माभळे, ओझरे खुर्द, शिवणे, ताम्हाणे, आंबव, मेढे तर्फ फुणगुस, असुर्डे, मांजरे, कळंबस्ते, साडवली, किरडुवे, मासरंग, कळंबुशी, बोरसूद, शेंबवणे, फुणगुस, माखजन या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत करण्यात आली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी नावडी, लोवले, देवळे, करजुवे, साखरपा, आंबवली, वाशी तर्फे संगमेश्वर, कोळंबे, घोडवली, कोंडकदमराव, तेर्वे, हरपुडे, बामणोली, वांझोळे, कुरचुंडा, घाटीवळे, चोरवणे या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
सर्वसाधारण स्त्री आरक्षणात मुरादपूर, नांदळज, पांगरी, फणसवणे, विघ्रवली, सोनवणे, तिवरे तर्फे देवळे, मुर्शी, दाभोळे, कनकाडी, देवडे, निवेखुर्द, बेलारी बुद्रुक, रांगव, धामणी, कारभाटले, नायरी, तिवरे घेरा प्रचितगड, कोंडीवरे, आरवली, मुरडव, नारडुवे, धामापूर तर्फ संगमेश्वर, तांबेडी, तुरळ, ओझरखोल, वांद्री, मावळंगे, कासे, राजीवली, ओझरे बुद्रुक, डावखोल, हातीव, कोंड्ये, पाचांबे, पिरंदवणे, आंबेड बुद्रुक, शृंगारपूर, निवळी, शिरंबे, कुंडी, फणसट व पुर्ये तर्फे सावर्डा या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत झाली.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी परचुरी, डिंगणी, वाशी तर्फ देवरुख, निवे बुद्रुक, कोसुंब, करंबेळे तर्फ संगमेश्वर, वायंगणे, भडकंबा, पुर्ये तर्फे देवळे, किरबेट, बोंडये मारळ, खडीकोळवण, मोर्डे, कडवई, चिखली, कुचांबे, गोळवली, अंत्रवली, कसबा संगमेश्वर, कुंभारखणी खुर्द, उमरे, गुरववाडी, पोचरी, कोंडगाव, सरंद, पेढांबे, कुळये, मुचरी, कांटे, कर्ली, धामापूर तर्फ देवरुख, तुळसणी, सायले, चाफवली, आंगवली, कासारकोळवण, राजवाडी, बुरंबाड, कुंभारखणी बुद्रुक, फणसवणे, मेघी, सांगवे या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 15/Jul/2025














