खेडमध्ये ११४ ग्रामपंचायती सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

खेड : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले आहे. सोमवारी तहसील कार्यालयात ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. एप्रिल २०२५ ते मार्च २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

आरक्षण यादीत शिंगरी ग्रामपंचायत अनुसूचित जमातीच्या स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाली असून, कुळवंडी, मोरवंडे व शिर्शी या तीन ग्रामपंचायती अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच निळीक, बिजघर व भेलसई या तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.

सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित ३८ ग्रामपंचायती
अलसुरे, आंबये, करटेल, कावळे, कासई, केळणे, खवटी, खोपी, गुणदे, चिरणी, जैतापूर, तळघर, तळवट खेड, तळवटपाल, तळे, दयाळ, दाभिळ, दिवाणखवटी, देवघर, धामनंद, नांदगाव, नांदिवली, बोरज, भडगाव, माणी, मुंबके, मुरडे, लवेल, शिवतर, शेल्डी, संगलट, सवणस, सवणस खु., साखर, सात्वीणगाव, सुकंदर, सुसेरी व हेडली.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ३८ ग्रामपंचायती
असगणी, आंजनी, आयनी (भिलारे), आष्टी, कर्जी, कळंबणी खुर्द, काडवली, किंजळे तर्फे नातू, कुंभाड, कुडोशी, कुरवळ जावळी, कोतवली, कोरेगाव, घेरापालगड, चाकळे, चिंचघर, चोरवणे, तिसंगी, तुंबाड, धामणदिवी, धामणी, पोसरे बुद्रुक, फुरूस, बोरघर, भोस्ते, मुसाड, मेटे, वावे तर्फे नातृ वेरळ, शिरगाव, शिवबुद्रुक, सवेणी, साखरशेळी सापिर्ली, हुंबरी, होडखाड, जामगे, सुकिवली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित १० ग्रामपंचायती
आंबडस, कळंबणी बुद्रुक, कशेडी, घाणेखुंट घेरारसाळगड, चिंचवली, तिसे, पन्हाळजे, भरणे मोहणे, लोटे, वडगाव, वावे तर्फे खेड, शिरवली शेरवल.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित १६ ग्रामपंचायती
आंबवली, आवाशी, आस्तान, उधळेबुद्रुक, ऐनवरे कसबानातू, कोंडीवली, तुळशी खुर्द, पोयनार मांडवे, मिर्ले, वरवली, सोनगाव, चौगुले मोहल्ला बहिरवली, राजवेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 15/Jul/2025