राजापूर : राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे काढण्यात आले. त्यामध्ये ५० टक्के महिला आरक्षणानुसार एकूण १०१ ग्रामपंचायतींपैकी ५१ ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार आहेत.
त्यामध्ये दोन ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना सरपंच पदाचा बहूमान लाभणार आहे.
राजापूर शहरातील डॉ आंबेडकर भवन येथे तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यावेळी राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, नायब तहसीलदार विलास सरफरे, महसूल अधिकारी बाजीराव पाटील आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती यांचे आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात या प्रवर्गाच्या एकूण तीन ग्रामपंचायती असून शासनाच्या नियमानुसार तीन ग्रामपंचायती त्या प्रवर्गासाठी निवडण्यात आल्या. त्यामध्ये कळसवली, केळवली आणि शिवनेबुद्रुक यांचा समावेश होता. ५० टक्के आरक्षण धोरणानुसार कळसवलीआणि शिवनेबुद्रुक या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या. तर केळवली ही तिसरी ग्रामपंचायत याच प्रवर्गासाठी आरक्षित झाली.
त्यानंतर काढण्यात आलेल्या आरक्षणनुसार सरपंचांची जाहीर झालेली आरक्षणे पुढीलप्रमाणे-
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: (१४ ग्रामपंचायत) आजिवली, दसूर, हसोळ तर्फे सौंदळ, चुनाकोळवण, जैतापूर, तळगाव, आडवली, नाटे, कोतापूर, हातिवले, आंगले, ताम्हाणे, वाटूळ, झर्ये.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (१३ग्रामपंचायत) ओशिवळे, उपळे, धाऊलवल्ली, मंदरूळ, डोंगर, वाल्ये, कोंडये तर्फे सौंदळ, येळवण, मोरोशी, पांगरे बु, सोलगाव, साखरी नाटे, सागवे.
सर्वसाधारण स्त्री: (३५ ग्रामपंचायत) ओझर, हातदे, जुवाठी, राजवाडी, शेढे, भालावली, हरळ, कोदवली, रायपाटण, तुळसवडे, दळे, करक, मोसम, सौंदळ, वडदहसोळ, देवीहसोळ, कारवली, माडबन, ससाळे, खडी कोळवण, धोपेश्वर, अणसुरे, पाचल, खरवते, खिणगिणी, गोवळ, कशेळी, पांगरे खुर्द, महाळुंगे, कोडये तर्फे राजापूर, गोठणे दोनिवडे, कुवेशी, प्रिंदावण, शिवणे खुर्द, तेरवण.
सर्वसाधारण (३६ ग्रामपंचायत): आंबोळगड,कोंडसर बुद्रक,परटवली
वडवली, ओणी, मिठगवाणे, पेंडखळे, कणेरी भू, मूर, तळवडे, मोगरे,चिखलगांव, मिळंद, तारळ, काजिर्डा,देवाचे गोठणे, नाणार, वाडापेठ, कोळंब,दोनिवडे, निवेली, विल्ये, साखर,जुवै जैतापूर, पडवे, येरडव, शीळ,जवळेथर, परुळे,फुफेरे, शेजवली, कुंभवडे, पन्हळे तर्फे सौंदळ, उन्हाळे, कोंडीवळे.
ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के महिला आरक्षण धोरणानुसार ५१ ग्रामपंचायंतीवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून १४ आणि दोन अनुसूचित जाती जमाती असा सामावेश असून उर्वरीत ५० ग्रामपंचायटीमध्ये ३६ सर्वसाधारण, १३ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक अनुसूचित जाती जमाती असा सामावेश असणार आहे.
राजापूर तालुक्यातील जाहीर होणाऱ्या १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले होते. मनाजोगे आरक्षण पडावे अशी अनेकांची इच्छा होती. दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात अनेकांची पुरतीच निराशा झाली होती. पुन्हा एकदा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ती संधी मिळेल अशी आशा अनेकांना होती. मात्र काहींच्या मनाजोगे आरक्षण पडत असतानाच दुसरीकडे काहींच्या पदरी पुन्हा घोर निराशा पडली. तालुक्यातील अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये महिलासरपंच विराजमान होणार असल्याने त्या गावच्या विकासाची धुरा महिला भगिनींवर आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 15-07-2025














