दापोली : येऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडील अधिसूचनेनुसार २०२५-३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या दापोलीतील १०६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण नुकतेच प्रशासनाकडून तहसीलदार अर्चना बोंवे यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते आरक्षण चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले. आरक्षण झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला असला तरी अनेक इच्छूक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे समोर आले आहे.
एप्रिल महिन्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी देखील अनेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये येण्यास इच्छूक असणाऱ्यांना धक्का बसून अपेक्षित आरक्षण पडले नव्हते, तर काही ग्रामपंचायतींमध्ये योग्य आरक्षण पडल्याने अनेकजण आनंदी झाले होते. मात्र जुलै महिन्यात काही तांत्रिक कारणात्व पुन्हा आरक्षण जाहीर करण्यात आल्याने यातदेखील महत्वपूर्ण ग्रामपंचायतींमधील उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडून अनेकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यात अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गात २, अनुसूचित जाती या प्रवर्गात १, अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गात ३, अनुसूचित जमाती प्रवर्ग ३, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री१४, सर्वसाधारण स्त्री ३४, सर्वसाधारण ३४, तर नागरीकांचा मागास प्रवर्ग १५ अशा एकूण १०६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
शहरातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडलेल्या आरक्षणामध्ये विसापूर, शिर्दे या ग्रा. पं. साठी अनुसूचित जाती स्त्री आरक्षण असून नानटे या ग्रा. पं. साठी अनुसूचित जाती हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
तसेच पिसई, मुगीज माटवण यांच्यासाठी अनुसूचित जमाती स्त्री, वणौशी तर्फे नातू, आवाशी, वांझळोली अनुसूचित जमाती, इनामपांगारी, करंजगाव, कवडोली, कादिवली, टांगर, नवशी, भोमडी, शिरसाडी, साखळोली, आडे, आंबवली ब्रु. उंबर्ले, गव्हे, पालगड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, तर आपटी, खेर्डी, पन्हाळेकाजी, पाजपंढरी, फणसू, भोपण, शिवाजीनगर दापोली, हातिप, गिम्हवणे, तेरेवायंगणी, देगाव, भडवळे, मौजेदापोली, विरसई, साकुर्डे या ग्रा. पं. साठी नागरीकांचा मागास प्रवर्ग, तर अडखळ, आगरवायंगणी, आसूद, ओणनवसे, कर्दे, कांगवई, कुंभवे, कोळथरे, गावतळे, चिखलगाव, जामगे, जालगाव, टेटवली, डौली, ताडील, नवसे, पांगारी तर्फे हवेली, पाडले, बोंडीवली, रूखी, वडवली, वेळवी, शिरखल, शिरवणे, सातेरे तर्फे नातू, सुकोंडी, सोवेली, कुडावळे, कोळबांद्रे, पोफळवणे, वाकवली, सडवे, हर्णे या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
तसेच करंजाणी, असोंड, आंजर्ले, इळणे, उंबरशेत, उन्हवरे, उसगांव, करंजाळी, कळंबट, केळशी, टाळसुरे, दमामे, दाभोळ, देहेण, नवानगर, पाचवली, बांधतिवरे, बुरोंडी, महाळुंगे, मुर्डी, लाडघर, वनौशी तर्फे पंचनदी, शिवाजीनगर साखळोली, सारंग, सोंडेघर, कागोळे, कोंढे, गुडघे, चंद्रनगर, दाभीळ, पंचनदी, मांदिवली, मुरूड या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 15/Jul/2025














