रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचरांना १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या संदर्भात या महिलांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले आहे.
गेले ५ वर्षे जिल्हा परिषदेच्या अंशकालीन महिला परिचर या आंदोलन करीत आहेत. परंतू त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शेवटी १ जुलैपासून त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्यांचे कामबंद आंदोलन सुरुच असून रविवारी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर असताना मागण्यांबाबत निवेदन दिले. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्षा आकांक्षा कांबळे, स्वरा आगरे, पृथ्वी सावंत समृद्धी भाटकर आदी उपस्थित होत्या.
अंशकालीन या नावात बदल करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला परिचरांमधून थेट घेण्यात यावे, वेतन २१ हजार देण्यात यावे आदी य अंशकालीन परिचरांच्या मागण्या आहेत. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ३५० अंशकालीन महिला परिचर आहेत. सध्या या सर्व संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर थोडाफार परिणाम झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 15/Jul/2025














