जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना ए. डी. फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला.
कोळेकर हे मुख्याध्यापक संघाचे रत्नागिरीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे २६ जुलै रोजी त्याचे वितरण होणार आहे. मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना आदर्श पुरस्कार प्राप्त झल्यामुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 15/Jul/2025














