देवरूख : शहरातील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यावर्षीही या खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘होय, माझी मराठी, समृद्ध मराठी’, ‘मराठी भाषा आणि परप्रांतीय’ असे विषय ठेवण्यात आले आहेत. या लेख स्पर्धेतील लेखासाठी किमान शब्द संख्या १ हजार २००, तर कमाल शब्द संख्या १ हजार ५०० असणार आहे. लेख पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकाला १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ रुपये व तृतीय क्रमांकासाठी ७५० रुपये पारितोषिक आणि एक ग्रंथ व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धेचे लेख वाचनालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळी वाचनालयात आणून द्यावेत किंवा पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावेत, तसेच लेख वाचनालयाच्या ta6409001gmail.com ईमेलवरही पाठवता येणार आहे. ईमेलवर पाठवण्यात येणारे हे लेख युनिकोडमध्ये टाईप केलेले असावेत. स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी वाचनालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 15/Jul/2025














