रत्नागिरी आगारात वेटिंग लिस्टमधील १२ चालक-वाहक रूजू

रत्नागिरी : पल्ल्याच्या रत्नागिरी आगारात जून महिन्यात वेटिंग लिस्टमधील कोल्हापूर येथील तब्बल १२ चालक-वाहकांची नियुक्ती रत्नागिरी आगारात करण्यात आली आहे. त्यामुळे लांब जिल्हाअंतर्गतमधील चालक वाहकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी आगारात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या सर्व जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेसह रत्नागिरीकर करीत आहेत.

रत्नागिरी आगारासह इतर आगारात मोठ्या प्रमाणात चालक-वाहक यासह विविध जागा रिक्त असताना २०२४-२५ मध्ये डिसेंबरच्या कालावधीत तब्बल ९५ चालक, वाहक, दहा मेकॅनिक एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे इतर चालक, वाहकांवर डबल डयूटी करण्याचा भार पडला होता. चालक, वाहकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. इतर चालक वाहकांवर वाढत जाणारा भार पाहता रत्नागिरी आगाराने सातत्याने रिक्त पदासाठी पाठपुरावा केला होता. अखेर वेटिंगवर असलेले रत्नागिरी आगारात तब्बल ११ ते १२ चालक वाहकांची जून महिन्यात नियुक्ती करण्यात आली असून ते सेवेत रूजू झाले आहेत.

जिल्हांतर्गत लांब पल्ल्याच्या गाडयावर चालक वाहक म्हणून काम पाहत आहेत. भूमिपुत्रांना कधी मिळणार संधी रत्नागिरीसह कोकणातील कित्येक चाकरमानी रोजगारसाठी मुंबई, पुणे येथे जात असतात. रत्नागिरीतच चाकरमान्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास ते स्थलांतरीत का होतील. एसटीसह रेल्वे, सिव्हिल यासह विविध प्रशासकीय क्षेत्रात जागा रिक्त आहेत.

त्यामुळे या रिक्तपदावर भूमिपुत्रांना संधी द्यावी, जेणेकरून त्यांना आपल्या कोकणातच रोजगार मिळेल, रत्नागिरी आगारात ही मोठ्या प्रमाणात चालक वाहकासह इतर पदे आहेत. पदे भरताना कोकणातील व्यक्तींचा विचार व्हावा, अशीच मागणी सामान्य रत्नागिरीकर, संघटना, संस्था करीत आहेत. यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

रत्नागिरी आगारात काही नवीन चालक-वाहकांची नियुक्ती मागील महिन्यात झाली आहे. ते कामावर रूजही झाले आहेत- बालाजी आडमुळे, आहार व्यवस्थापक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 15/Jul/2025