दापोलीत गुरुवारी सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचे आयोजन

दापोली : दापोली तालुक्यातील ऐतिहासिक व गौरवशाली किल्ला ‘सुवर्णदुर्ग’ युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी दापोलीतील ज्ञानदीप संस्था आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलतर्फे गुरुवारी (ता. १७) सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयाजवळ सकाळी आनंदोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये ज्ञानदीप संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात किल्ल्याच्या गौरवाबद्दल व्याख्यान, विद्यार्थ्यांची रॅली, लेझीम पथक वाद्यवृंद, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 15/Jul/2025