रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनामार्फत सातजणांची विभागीय, खातेनिहाय चौकशी सुरू

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनामार्फत सातजणांची विभागीय आणि खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक आणि प्रशासनाविरोधात कार्यवाही करणाऱ्या शिक्षकासह ग्रामसेवकाचा समावेश आहे. यामध्ये काही शिक्षकांची दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ही माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधील कारभारावर सामान्य प्रशासनाचा अंकुश असतो. त्यामुळे कोणत्याही विभागात काही अनियमितता आढळून आली किंवा तक्रार झाली तरी त्यावरून चौकशी लागते. अशा प्रकारे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील चार शिक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. यामध्ये काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, निलंबित झालेल्या एका शिक्षकाची पुन्हा चौकशी लागली आहे. या शिक्षकाने प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका आहे. लांजा येथील एका ग्रामसेवकाची चौकशी लावली आहे. ग्रामसेवकाने केलेल्या अनियमित कारभाराविरुद्ध ही चौकशी सुरू आहे. दोन शिक्षकांची विभागीय चौकशी सुरू आहे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचीही चौकशी सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 15/Jul/2025