रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव-मुस्लिम मोहल्ला येथे अरुंद रस्त्यावर दुचाकी पार्क करून वाहतूक व रहदारीस अडथळा करणाऱ्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजल दाऊद मुजावर (वय ४०, रा. शिरगाव- मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सायंकाळी शिरगाव-मुस्लिम मोहल्ला येथील अरुंद रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित फैजल मुजावर यांनी दुचाकी मुस्लिम मोहल्ला येथील मुजावर किराणा दुकानासमोर पार्क केली. तेथील अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विजय आंब्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 15-07-2025














