संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ ग्रामपंचायतीला नवीन घंटागाडी मिळाली असून, आता कचऱ्याचे नियोजन करणे सोपे होणार आहे. तुरळ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला मिळालेल्या नव्या घंटागाडीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
या वेळी सरपंच सहदेव सुवरे, उपसरपंच अनंत पाचकले, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हारेकर, विनायक गुरव तसेच राजेंद्र सुर्वे, कृष्णाजी हरेकर, माजी सरपंच अरविंद जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जाधव, पोलिसपाटील संजय ओकटे व ग्रामस्थ सुरेश पवार, चंद्रकांत तुरळकर, नंदकुमार फडकले, मुकुंद गुरव, उदय मोहिते आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 15/Jul/2025














