संगमेश्वर : गटार खोदताना विद्युतपुरवठा करणारी केबल उघड्यावर

संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तेथील गटार खोदताना विद्युतपुरवठा करणारी केबल उघड्यावर ठेवल्यामुळे या परिसरात धोका निर्माण झालेला आहे. येथील केबल खराब झाली असून, बाजारपेठेचा विद्युतपुरवठा त्या एका केबलवरच अवलंबून आहे. ती केबलही उघड्यावर आल्यामुळे तुटण्याची शक्यता आहे.

महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत ठेकेदार कंपनीकडून भूमिगत केबल टाकण्यात आली आहे, मात्र त्या केबल निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या केबलच्या दर्जाबाबत कोणतीही खातरजमा न करता ती वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून भविष्यात ही केबल खराब झाल्यास संपूर्ण बाजारपेठ अंधारात जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक व्यापारी, नागरिक याच्यामध्ये संतापाची भावना असून, ठेकेदार कंपनीकडून चाललेल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, निकृष्ट केबल बदलून दर्जेदार केबलची व्यवस्था करावी आणि विद्युत सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 15/Jul/2025