असुर्डे : चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे गेल्या १७ ते १८ वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारला गेला आहे. टॉवर उभारल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बीएसएनएलचे कार्ड विकत घेतले होते. मात्र, काही दिवसांतच या बीएसएनएल टॉवरच्या समस्या चालू झाल्या. पण, गेल्या तीन महिन्यांपासून या टॉवरची रेंज गायब झाली आहे.
गोरगरीब शेतकरी आज, उद्या हा टॉवर सुरू होईल या आशेने तीन महिने मोबाइल रिचार्ज करत आहेत. परंतु, त्यांची आशा फोल ठरत आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ भाद्रपदातील गौरीसारखी एकदाच दीड दिवस रेंज आली. त्यानंतर सर्व व्यवस्था ठप्प आहे.
अनेक जण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सतत फोन करून ही समस्या सांगत आहेत. परंतु, आजतागायत त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 15/Jul/2025

–













