रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची दुरुस्ती करणे गरजेच आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनामधून ३५ नादुरुस्त पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी न आल्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत.
जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखाने २० ते २५ वर्षे जुनाट आहेत. त्यामुळे इमारतींना गळती लागलेली आहे. नादुरुस्त झालेले दरवाजे, तडे गेलेल्या भिंती अशी स्थिती ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने, तसेच पशुचिकित्सालयाची झाली आहे. त्यामुळे अशा गळक्या आणि नादुरुस्त पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती न झाल्यास इमारती कोसळण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे भीतीच्या छायेत गेलेल्या भिंती अशी स्थिती ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने, तसेच पशुचिकित्सालयाची झाली आहे. त्यामुळे अशा गळक्या आणि नादुरुस्त पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती न झाल्यास इमारती कोसळण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे भीतीच्या छायेत कामकाज सुरू आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मागणी करूनही पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे आवश्यक असलेल्या दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत. या दवाखान्यांच्या दुरुस्तीकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दिवसेंदिवस या दवाखान्यांची अवस्था फार बिकट झाली आहे.
नादुरुस्त दवाखान्यांमुळे पशुपालकांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. शासनाकडून पशुपालकांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतानाच जिल्ह्यातील नादुरुस्त झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनामधून निधी मंजूर करण्यात आला आहे; मात्र हा निधी अजूनही न मिळाल्याने दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सध्या हा निधी गेला कुणीकडे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात १५१ दवाखाने
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि शासनाचा पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-२ चे ५१ दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-१ ते २० दवाखाने, ४ पशुचिकित्सालये, जिल्हा चिकित्सालय १ आणि ७५ पशुचिकित्सालये अशी एकूण १५१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 15/Jul/2025














