पाली : वळके येथे शेतकरी सुवेद शिवगण यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सरपंच उत्तम सावंत, ग्रा.पं. सदस्य माधुरी सावंत, सुभाष सावंत, उषा सावंत, ग्रा.पं. अधिकारी श्री. दळवी उपस्थित होते. यावेळी वळके ग्रामस्थांना कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती दिली. तसेच खानू येथे सेंद्रिय पद्धतीने चारसुत्री भात लागवड करण्यात आली. यावेळी शेतकरी श्रीम. सुवारे, सौरभ सुवारे, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी खरिप पीक स्पर्धक म्हणुन शेतकरी संभाजी सुवारे यांची निवड करण्यात आली. तसेच हळद लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी ही मोहिम महाकृषि अॅप मध्ये नोंदविण्यात आली. सहायक कृषी अधिकारी सागर सांगवे, अजय कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
समृद्धी शेतकरी गट वेतोशी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत नाचणी पीक प्रात्यक्षिक (ठोंबा पद्धतीने) घेण्यात आले तसेच खत व्यवस्थापन, कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती सहायक कृषी अधिकारी सचिन पवार यांनी दिली. वेळवंड येथे तुकाराम रत्नाकर भायजे या शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावर जिल्हा नियोजन समिती मार्फत प्राप्त झालेल्या नाचणी बियाण्याची पुनर्लागवड करण्यात आली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, पंतप्रधान किसान योजना, ऍग्रीस्टैंक, माती परीक्षण योजने विषयी माहिती देण्यात आली. सहायक कृषी अधिकारी सागर सांगवे, अजय कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 15/Jul/2025














