चिपळूण : गेल्या चोवीस तासात कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी, शिव नदी दुथडी भरून वाहू लागली. चिपळुणात काल सकाळी ८ वाजेपर्यंत १४३ मि.मी. पाऊस झाला तर आतापर्यंत १ हजार ४७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यंतरी गेले आठ दिवस पावसाला जोर नसल्याने भात लावणीची कामे रखडली होती. मात्र, गेल्या बारा तासांत जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.
(दि.१५) वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ४.०४ मी. पर्यंत पोहोचली होती. मात्र वाशिष्ठीने इशारा पातळी ओलांडली नाही. त्यामुळे चिपळुणात कोठेही पाण्याचा फटका बसला नाही. फक्त लोटिस्मा वाचनालयाजवळील रस्त्यावर काही काळ पाणी आले होते. त्यामुळे तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम सतर्क होती.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरात पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 16/Jul/2025














