नरबे फाटा ट्रकची टेम्पोला धडक; तीनजण जखमी

रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक देत अपघात केला. या अपघातात तीनजण जखमी झाले असून अपघाताची ही घटना मंगळवार १५ जुलै रोजी सकाळी ६.३० वा. सुमारास नरबे फाटा येथे घडली.

या अपघातात फिरदोस न्यायत खले (४०), अमजत आलेमिया जांभारकर (५०) आणि मुज्जफिर अमजत जांभारकर (तिन्ही रा. पडवे, गुहागर) हे जखमी झाले. याबाबत फिरदोस न्यायत खले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, १५ जुलै रोजी खबर देणार आणि त्यांच्यासोबत असलेले दोघेजण हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो (एमएच-०८-डब्ल्यू-४७०३) मधून पहाटे ४.३० वा. सुमारास जाकादेवी ते मिरकरवाडा जेटी असे जात होते. ते सकाळी ६.३० वा. सुमारास तरवळ घवाळीवाडी स्टॉपच्या अलीकडे नर्भे फाट्यच्यापुढे आले असता निवळी बाजुकडून येणारा ट्रक (एमएच-०९-जीजे-४३४७) आणि या टेम्पोचा अपघात झाला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 16/Jul/2025