रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी गयाळवाडी फाटा येथील रस्त्यावर अज्ञात बालेरो पिकअप गाडीने गाईच्या वासराला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना रविवार १३ जुलै रोजी रात्री ९.४५ वा. सुमारास घडली.
याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रतिक विलास बारगुडे (२६, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री तो कुवारबाव ते कारवांचीवाडी असा प्रवास करत होता. त्यावेळी गयाळवाडी फाटा येथे एका अज्ञात बोलेरो पिकअप गाडी चालकाने वासराला धडक देत न थांबता निघून गेला. या अपघातात गाईच्या वासराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 16/Jul/2025














