रत्नागिरी : कोतवडे गवाणवाडी येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे गवाणवाडी येथील रस्त्यावर बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचाऱ्याला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना सोमवार १४ जुलै रोजी दुपारी १२.३० वा. घडली. अनिश दीपक कोलगे (रा. कोतवडे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे.

यातील फिर्यादींचा भाऊ संदीप दुधरे हा सोमवारी दुपारी कोतवडे ते गवाणवाडी रस्त्याने चालत येत होते. त्यावेळी संशयिताने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एके-९७५२) बेदरकारपणे चालवून त्याला धडक देत अपघात केला. यात संदीपच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 16/Jul/2025