देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले वरचेवठार येथील ५४ वर्षीय प्रौढ विनय परशुराम पवार यांचा झोपेत असताना सोफ्यावरुन अचानक खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१३ जुलै) दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विनय पवार हे आपल्या घरी दुपारच्या वेळेला हॉलमधील सोफ्यावर झोपले होते. त्यावेळी अचानक ते खाली कोसळले. त्यावर त्याच्याकडून कोणतीच हालचाल न झाल्याचे लक्षात येताच त्यांचे चुलत भाऊ आणि शेजारी असलेल्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले, तरी संपूर्ण परिसरात या अचानक घडलेल्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. यामुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 16/Jul/2025














