चिपळूण : तालुक्यातील पाचाड चिलेवाडी येथील पाचाड गावातील मुंबईकर व ग्रामस्थ मंडळींनी गावातील पाण्याची समस्या कायमची सोडवण्याच्या दृष्टीने यशस्वी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवारी विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यासाठी गावात २ फुटांचे सुमारे १२५ खड्डे पाडून इथून सात नवे बंधारे बांधले आहेत. चाकरमान्यांनी एकत्र येत’पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत श्रमदानातून सात बंधारे उभारले आहेत.
याचबरोबर गावातील पडीक जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करत अंतर्गत रस्त्यांवरील झाडाझुडपांची स्वच्छताही करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधारा बांधणी कार्यक्रमात माजी सभापती शौकत मुकादम यांनी वृक्ष लागवड, संवर्धन आणि जलसंधारणाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. अशाप्रकारचे उपक्रम गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष चिले आणि ग्रामपंचायतीचे सरपंच कुळे यांनी स्वागत केले. शौकत मुकादम हे रेल्वेसंदर्भात कोकणी लोकांसाठी उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याबद्दल चिपळूण तालुका पाचाड येथील मुंबई मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक मंडळाचे अध्यक्ष चिले यांनी आभार मानले. रवी चिले, प्रशांत चिले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, क्रांतीकचे सचिव जयेंद्रथ खताते, विकास गमरे, पंचायत समितीचे अधिकारी दाभोळकर यांनी पाचाड चिलेवाडीला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळातील चाकरमान्यांचे विशेष कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 16/Jul/2025














