देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रूक येथील २९ वर्षीय तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुखदा मंगेश यादव (२९, रा. निवे बुद्रुक, ता. संगमेश्वर) मृत झालेल्या युवतीचे नाव आहे.
सुखदा हिने ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता कीटकनाशक औषध सेवन केले होते. यानंतर सुखदाला तातडीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यानंतर तिला कोल्हापूर येथील सी.पी. आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर तिचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 16/Jul/2025














