लांजा : लांजा तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप २०२५-२६ हंगामाकरिता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत सदर योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी पीक विमा पाठशाळा उत्साहात पार पडली.
रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत १ जुलै ते ३१ जुलै मुदतवाढ देण्यात आली असल्याने लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची सखोल माहिती देण्याच्या अनुषंगाने पीक विमा पाठशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर योजनेत शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास भारतीय कृषि विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी तेजस लांजेकर तसेच तालुका कृषी अधिकारी ए. एस. शेलार, कृषी मंडळ अधिकारी एस. एम. कदम, मंडळ कृषी अधिकारी के. व्ही. शिंदे, मंडळ कृषी अधिकारी ए. आर. मोरे, सहायक कृषी अधिकारी प्रवीण रत्नपारीखी यांचे प्रोत्साहन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 16/Jul/2025














