चिपळूण आगारास मार्ग फलकांचे वितरण

चिपळूण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चिपळूण एसटी आगाराला चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेच्या सौजन्याने मार्ग फलक वितरण करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील विविध ५० मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बससाठी हे रूट बोर्ड उपयुक्त ठरणार आहेत.

या उपक्रमांतर्गत फलक चिपळूण डेपो मॅनेजर श्री. चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तथा बाबू तांबे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उदय गांधी, बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष रहीमान दलवाई, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतीश खेडेकर, संचालिका राधिका पाथरे, संचालक अॅड. दिलीप दळी, रत्नदीप देवळेकर, सुनिल खेडेकर, सीईओ तुषार सूर्यवंशी, सिओ नितीन चिंगळे, सिनियर अधिकारी संजय कामेरकर, प्रशासन अधिकारी समीर जंगम, संतोष चौघुले यांच्यासह एसटी डेपोचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 16/Jul/2025