लांजा, १२ जुलै: डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा प्रशालेची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची पालक सभा गणेश मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. आर. डी. उर्फ अण्णा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. या सभेला संस्थेचे सदस्य श्री. दीपक कामत सर, श्री. तेंडुलकर सर यांच्यासह लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. रमाकांत सावंत सर, वाटुळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर कामत सर, खावडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय देसाई सर, डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उपाध्ये सर, पर्यवेक्षिका सौ. सातपुते मॅडम, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला उपस्थित पालक व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे इतिवृत्त सादर करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. वाटुळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. कामत सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सक्ती न करता त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करून अभ्यासातील गोडी वाढवण्याचा सल्ला दिला. खावडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. देसाई सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानरचनावाद वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले आणि पालकांना घरी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित केले. लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. सावंत सरांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देण्याचे आवाहन केले.
या महत्त्वपूर्ण सभेत, शाळा व्यवस्थापन समितीने एक मोठी घोषणा केली. लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. रमाकांत सावंत सर (विज्ञान विषय पारंगत), वाटुळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर कामत सर (गणित विषय पारंगत) आणि खावडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय देसाई सर (इंग्रजी/भाषा पारंगत) या तीनही अनुभवी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची प्रशालेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक वर्षापासून निवड करण्यात आली आहे.
या सभेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच MTS, BDS आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले. याव्यतिरिक्त, माता-पालक संघ आणि पालक-शिक्षक संघटना स्थापन करण्यात आल्या. नियोजनबद्ध पद्धतीने उपस्थित पालक आणि मान्यवरांचे आभार मानून सभेची सांगता झाली.
सभेनंतर पाचवी व आठवीच्या पालकांची स्वतंत्र सभा घेऊन शिष्यवृत्ती संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 17-07-2025














