कापसाळ-कामथे दरम्यान स्कूल बसला कंटेनरची धडक

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ-कामथे दरम्यान स्कूल बसच्या मागील बाजूस कंटेनरची धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. मात्र, स्कूल बसचे नुकसान झाले आहे. चिपळूणच्या दिशेने कामथेकडे निघालेल्या एसपीएम स्कूल परशुराम शाळेची स्कूल बस कापसाळ कामथे दरम्यान विद्यार्थ्यांना घेण्यास अचानकपणे महामार्गावर थांबली. याचवेळी सावर्डेकडे जाणारा कंटेनर या स्कूल बसला मागच्या बाजूस धडकला. यामध्ये स्कूल बसचे मागील बाजूचे नुकसान झाले आहे. काचा फुटून पत्रा आत चेपला गेला आहे.

या अपघातात सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्यांला दुखापत झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस मुंबई-गोवा महामार्गावरूनच राजरोसपणे ये-जा करीत आहेत. त्या सर्व्हिस रोडचा वापर का करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 17/Jul/2025