रत्नागिरी, १६ जुलै : चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील दिपेश संजय कदम (वय ३४) या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ९ जुलै रोजी पहाटे २.१५ वाजता साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश कदमने ३ जुलै रोजी चिपळूण येथे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला तातडीने चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला पुढील उपचारांसाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर, ८ जुलै रोजी रात्री ८.१५ वाजता त्याला साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच, ९ जुलै रोजी पहाटे २.१५ वाजता त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी १६ जुलै रोजी सायंकाळी ५.१० वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता सुरक्षा अधिनियम (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 17-07-2025














