चिपळूण : वाशिष्ठीवरील नव्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम लवकरच

चिपळूण : पेठमाप ते महाराष्ट्र हायस्कूल या भागाला जोडणारा वाशिष्ठी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता असून आमदार शेखर निकम यांनी या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याने नगर परिषद प्रशासनाकडून ई-निविदा प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे येत्या वर्षभरात या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. महाराष्ट्र हायस्कूल व पेठमाप भाटण यामधून बाजार पूल, मिरजोळी भागाकडे प्रवाहीत होणाऱ्या वाशिष्ठी नदीवर पूल उभारावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 19/Jul/2025