साखरपा गुरववाडी परिसरात गव्यांचा दिवसाढवळ्या वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथे दिवसाढवळ्या गवारेडे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच वस्तीपासून जवळच गवारेडे येत असल्याने गुरे चरण्यास जाणारे गुराखी गवारेड्याच्या भीतीने धास्तावले आहेत. त्यातच शेतीचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.

साखरपा गुरववाडीचा मार्ग पुढे बोंडये व मारळ गावाला जोडतो. त्यामुळे येथे नेहमी रहदारी असते. त्याचबरोबर गुरववाडीतील ग्रामस्थ यांची कामानिमित्त व खरेदीसाठी साखरपा बाजारपेठ येथे सतत येजा असते. मात्र गवारेड्यांच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती वाढली आहे. गत काही महिन्यापूर्वी याच मार्गदरम्यान बिबट्याने गुरववाडीतील एका तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केला होता. तेव्हाही परिसरात भीतीचे वातावरण होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 21/Jul/2025