गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांना दिले. चिपळूण तालुक्यातील उभळे, तनाळी, पाली, मडाळ, कळमुंडी, तनाळी, आंबेरे, गुढे, डुगवे, चिवेली, गोंधळे अशा गावांमध्ये व्यावहारिक साधन नसल्यामुळे या गावातील शेतकरी मागे पडत आहेत. शेतकरी शेतीकडे वळून त्यामधून उत्पन्न मिळावे व यासाठी गावोगावी बैठक घेऊन कृषी बाजार समितीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
येथील शेतकरी अनेक प्रकारच्या भाजीपाला, फळे यांची शेती करतो; पण ते विकण्यासाठी व विकत घेण्यासाठी बाजार नसल्यामुळे शेतकरी खूप हतबल होत आहे. त्यामुळे या भागाला बाजार समिती मिळावी, अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 21/Jul/2025














