Ratnagiri : लोटेत आज रोजगार मेळावा

खेड : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मंगळवारी (ता. २२) सकाळी १० वाजता लोटे परशुराम इंडस्ट्रियल असोसिएशनमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मेळाव्यात प्रामुख्याने कॉरटेव्हा क्रॉप इंडिया, एमईएसएम परशुराम हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, एक्सल इंडस्ट्रीज आणि घरडा केमिकल आस्थापनांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विविध पदांसाठी ४५० मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे इच्छुकांनी बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 22-07-2025