मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भाजपातर्फे आज रक्तदान शिबिर

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. २२) भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालयात शिबिर होईल. या उपक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, तसेच शहर मंडल यांच्या पुढाकाराने करण्यात येत असून, नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा व्हावा, या हेतूने हे शिबिर घेतले जात आहे. यावेळी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 22-07-2025