परशुराम घाटात मातीचा भराव कोसळला

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मातीचा भराव कोसळल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनत आहे. घाटातील संरक्षक भिंतीच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भागांतील भराव कोसळल्यामुळे भीती व्यक्त होत आहे. मात्र, घाटातून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी (दि.२१) सकाळी घाटात मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने प्रवाशांना परशुराम घाटातून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 22/Jul/2025