संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेनेंतर्गत सीमेवरील जवानांसाठी स्वतः राख्या बनवून भेट दिल्या. या राख्या सिंधुदुर्ग ५८ बटालियनचे हवालदार प्रदीप पाटील व हवालदार संतोष भाटकर यांच्याकडे टी. ओ. संतोष साळुंखे यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.
राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख नीलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गात राख्या बनवल्या व सीमेवरील जवानांचे योगदान लक्षात घेऊन, या जवानांप्रती असलेले प्रेम राखीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आहे. या राख्या देताना नीलेश कुंभार, मिलिंद कडवईकर व प्रदीप कानाल उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक शेषेराव अवघडे व पर्यवेक्षक संतोष साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत उजगावकर, उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 25/Jul/2025














